अमळनेरात आज गुरुनानक देवजी जयंतीचा भक्तिमय सोहळा!

अमळनेर (प्रतिनिधी) शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक देवजी यांचा जन्मोत्सव अमळनेर येथे आज मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. समस्त सिंधी समाज, अमळनेर यांच्या वतीने यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, प्रभात फेरी, सत्संग आणि लंगरच्या माध्यमातून गुरुनानक देवजींच्या शिकवणीचा व सेवेचा संदेश दिला जाणार आहे.

जयंती महोत्सवानिमित्त पहाटे ४.३० वाजता प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता सत्संगाचे आयोजन करण्यात आले असून, रात्री ९ ते ११ या वेळेत लंगर (महाप्रसाद) होणार आहे. हे सर्व कार्यक्रम भाई लुधासिंग दरबार, सिंधी हाऊसिंग सोसायटी, अमळनेर येथे पार पडणार आहेत. गुरुनानक देवजींच्या शिकवणीचा प्रसार, सेवा आणि सत्संग या भावनेतून हा जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. या धार्मिक सोहळ्यात भाविकांनी सहकुटुंब सहभागी होऊन सत्संग, सेवा आणि लंगरचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त सिंधी समाज, अमळनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *