महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जशी आहे, तशीच ठेवा

अमळनेर काँग्रेस कमिटीच्या सभेत पदाधिकाऱ्यांनी केला ठराव

 

अमळनेर (प्रतिनिधी) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जशी आहे, तशीच राहावी असा ठराव,  अमळनेर काँग्रेस कमिटीच्या सभेत करण्यात आला.

अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीची सभा नुकतीच विद्युत कर्मचाऱ्यांच्या पतपेढीत झाली.  सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त, महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष  बी. के. सूर्यवंशी यांनी प्रस्ताविकात, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) व विकसित भारत गॅरंटी फार रोजगार आणि अजिविका मिशन ग्रामीण (जी राम जी)  या दोन्ही योजना संबंधी तुलनात्मक स्पष्टीकरण दिले. त्यात मनरेगा योजना ही ग्रामीण भागासाठी, ग्रामपंचायतसाठी कशी हितावह होती हे सांगितले. स्पष्टीकरण करत असतानाच, पदाधिकाऱ्यांकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जशी आहे, तशीच राहावी असा ठराव देखील एकमताने पारित झाला. त्यानंतर मनोज पाटील यांनी मनरेगा योजनेसाठी ठरावाचा नमुना तयार करून तालुक्यातील ग्रामपंचायतींना पाठवावा, म्हणजे ग्रामीण जनतेच्या विचारांना खरी दिशा मिळेल.  संदीप घोरपडे यांनी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी “कशी तयारी करावी” यासाठीचे मुद्देसूद स्पष्टीकरण केले व बुथ लेवल  कार्यकर्त्यांच्या सभा, गणानुसार घेण्याचे सांगितले. बन्सीलाल भागवत, भगवान संदानशिव, महेश दगडू पाटील, दिलीप साहेबराव पाटील, राजेंद्र भिकन पाटील, राजेंद्र पोलाद चौधरी, कैलास प्रल्हाद पाटील, के. व्ही. पाटील यांनीही सहभाग घेतला. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, विजय पाटील, तुषार संधान शिव, तौसीब तेली, सुधाकर भैसे, रामकृष्ण नामदेव पाटील, पितांबर देवराम पाटील, सईद तेली, जयदीप शिसोदिया, राजू भाट, रोहिदास कापडे, लोटन मोतीराम पाटील, कन्हैयालाल कापडे, अनिल माधवराव पाटील, हर्षल जाधव, अधिकार नथू पाटील, शालिग्राम पाटील उपस्थित होते. आभार शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे यांनी मानले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *