जळोद ते विद्येश्वर महादेव मंदिर कावळ यात्रा उत्साहात

अमळनेर (प्रतिनिधी) : येथील विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिराच्या वतीने बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी जळोद ते विद्येश्वर महादेव मंदिर अशी पायी कावळ यात्रा उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली. यात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत भगवान विद्येश्वर महादेवाचे दर्शन घेतले.

यात्रेदरम्यान अमळगाव येथे जयंत पाटील यांच्या वतीने भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांनी या सुविधेचा लाभ घेतला. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात यात्रेची सांगता झाली.

या कावळ यात्रेत रवि पाटील, संजय पाटील, अशोक साळुंखे, अमोल पाटील, सुनील शिगांणे, राहुल सोनवणे, प्रविण गुजर, विवेक तेले, कल्पेश साळुंखे, नरेंद्र गुजर, प्रविण महाजन, विवेक पाटील, सागर पाटील, सनी पाटील, सचिन सोनवणे, मोहित पवार, भगीरथ पाटील, अनिल शिगांणे, चेतन पाटील, प्रविण वाघ, सुभाष चव्हाण, दीपक गुजर आणि सिद्धार्थ पाटील यांच्यासह महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यात्रेमुळे परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी उत्साहात भगवान महादेवाचा जयघोष करत पायी कावळ यात्रा पूर्ण केली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *