अंबर्शी टेकडीवर पुन्हा एकदा समाज कंटकांमुळे लागलेल्या आगीत सुमारे ५० ते ६० झाडे जळाली

अमळनेर (प्रतिनिधी) अंबर्शी टेकडीवर पुन्हा एकदा समाज कंटकांमुळे आग लागली. टेकडी प्रेमी आणि पालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रणात आणली. मात्र या आगीत सुमारे ५० ते ६० झाडे जळून नुकसान झाले.

टेकडीच्या खालच्या बाजूला सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास आग लागली. रमेश कंजर, नरेश कांबळे, सुरेश भावसार यांनी सुरुवातीला आग विझवण्याचे प्रयत्न केले. त्यांनंतर मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना कळवण्यात आले. त्यांनी अग्निशमन दल पाठवल. दलप्रमुख गणेश गोसावी, दिनेश बिऱ्हाडे, फारुख शेख, जफर पठाण, भिका संदानशिव, आकाश संदानशिव यांनी घटनास्थळी पोहचवून आग आटोक्यात आणली. अन्यथा आगीत आणखी काही झाडे जळून खाक झाली असती. अंबर्शी टेकडी हे निसर्गरम्य स्थान असून पालिकेचे जल शुद्धीकरण केंद्र देखील आहे. दरवर्षी याठिकाणी झाडे लावली जातात. मात्र समाज कंटकांमुळे, बिडी, सिगारेट आणि गांजा पिणारे याठिकाणी पेटती काडी टाकून निघून जातात आणि आग लागून दरवर्षी झाडे जळतात. पालिका आणि पोलीस प्रशासनने काहीतरी उपाययोजना राबवून अशा समाज कंटकाना आळा घालावा आणि पर्यावरणाचे रक्षण करावे, अशी मागणी होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *