
चांदणी कुऱ्हे खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या गावठाण जागेवरील सोलर प्लांट मधून ३२ हजारांची वायर चोरी
शाहआलम नगर मध्ये मोटरसायकल चोरी
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चांदणी कुऱ्हे खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या गावठाण जागेवरील सोलर प्लांट मधून ३२ हजार ६०० रुपयांची वायर चोरट्यानी चोरून नेल्याची घटना २५ जानेवारी रोजी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की ज्ञानेश्वर गणसिंग पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की ग्रामपंचायतीच्या गट नंबर २९१ मधून सोलर प्लांट ची ३० हजार रुपये किमतीची १५०० मीटर डीसी केबल वायर आणि २ हजार ६०० रुपये किमतीची ९७ मॉडेल वरील जे बी कट वायर अज्ञात चोरट्याने २५ रोजी रात्री ते २६ रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान चोरून नेली. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण कुमावत करीत आहेत.
मोटरसायकल चोरी
त्याचप्रमाणे शाहआलम नगर मधील वासीमबेग असिफबेग मिर्झा यांची मोटरसायकल( क्रमांक एम एच १८ एक्स ४९०७ ) ही ७ फेब्रुवारी रोजी अमळनेर बसस्थानक समोर निलेश मेडिकल जवळ लावली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अमळनेर पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.

Leave a Reply