
ओम गुरूदेव नमः महिला पतंजली योग समितीतर्फे महाशिवरात्री उत्सव साजरा, कार्यकारिणीही गठीत
अमळनेर (प्रतिनिधी) येथील ओम गुरुदेव नमः महिला पतंजली योग समिती मार्फत महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवाचे औचित्य साधून अमळनेर तहसीलसाठी समीतीही गठीत करण्यात आली.
समितीचा पदग्रहण सोहळा जिल्हा महामंत्री ज्योती पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यात अमळनेर तहसील प्रभारी कामिनी पवार, कोषाध्यक्ष रत्ना भदाणे आणि प्रा.उषा पवार, संघटन मंत्री निवेदिता कापडणे, महामंत्री ज्योती पाटील आणि वैशाली भामरे, मिडीया प्रभारी माधुरी पाटील आणि रेखा भागवत, संवाद प्रभारी रुपाली पाटील आणि रूपाली बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला होम हवन सोहळा पार पडला. रेऊनगर येथील विश्वकर्मा मंदिर ढेकूरोड महादेवाची आराधना करून सोहळा पार पडला. प्रत्येक योग वर्गातील योग साधकाने आपल्याला योगाचे फायदे व सकारात्मक अनुभव सांगितले. या कार्यक्रमात तांबेपुरा, शिवाजी नगर, रामवाडी, पटवारी काॅलनी, ढेकू रोड , पिंपळे रोड , दाजीबा नगर असे सर्व 10 योग वर्गाचे योग शिक्षक व योग साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समिती गठीत करण्यासाठी जिल्हा प्रभारी जयश्री पाटील व राज्य कार्यकारणी महानंदा पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कामिनी पवार आणि सर्व योग शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply