जीवे ठार मारल्याने आरोपीस दहा वर्षे सश्रम कारावास आणि 5000 रुपये दंडाची न्यायालयाने ठोठावली शिक्षा

अमळनेर न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

 

अमळनेर (प्रतिनिधी) जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यात आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे (वय 33 वर्ष,रा. पुनगाव ता. चोपड़ा हल्ली मु. देवगांव ता. चोपडा) यांस 10 वर्षे सश्रम कारावास आणि 5000  रुपये दंडाची शिक्षा अमळनेर न्यायालयाने सुनावली आहे.

याबाबत घटनेची सविस्तर माहिती अशी की,  देवगाव गावी प्लॉट भागात  दि. 14 ऑक्टोबर 2021 रोजी भावना रविंद्र पाटील यांच्या घरासमोर त्यांचे पती हे दारू पिलेले होते. ते पत्नीला शिविगाळ करीत होते, तेव्हा चंद्रशेखर सपकाळे याने मला का शिविगाळ करतो असे बोलुन रविंद्र पाटील यास शिविगाळ करू लागला, त्यावेळी ते त्यास म्हणाले की मी तुला शिविगाळ करीत नाही, असे बोलले असता त्याचा राग येवुन चंद्रशेखर नामदेव सपकाळे याने रविंद्र पाटील यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून खाली पाडले व जवळच लागलेले त्याचे बैलगाडीचे लाकडी शिंगाडे काढुन त्या शिंगाड्याने पोटावर, पाठीवर जिवे मारण्याचे उद्देशाने मारहाण केली. दिनांक 16 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांना जळगाव येथील सरकारी दवाखान्यात वर्ग केले असता उपचारादम्यान रविंद्र पाटील याचा गंभीर जखमांमुळे मृत्यू झाला. याप्रकरणी अडावद पो. स्टे. गु. येथे र.न. 149/2021, सेशन केस नं. 13/2022, गुन्हा भा.द.वि. कलम 302, 504 प्रमाणे दाखल आहे. म्हणून न्यायालयाने आरोपीताविरुध्द भा.द.वि. कलम 302, 504 प्रमाण दोषारोप ठेवला होता. त्यानंतर सरकार पक्षातर्फे खटल्याची चौकशी सुरू करण्यात आली. सदर खटल्याचे काम जिल्हा न्यायाधीश 1 व अति. सत्र न्यायाधीश श्रीमती. सी. व्ही. पाटील यांचेपुढे चालले. त्यात सरकारी वकील ॲड. के. आर. बागुल मंगरूळकर यांनी एकूण 09 साक्षीदार तपासले. त्यातील फिर्यादी मयताची पत्नी, मयताचे वडील व प्रत्यक्षदर्शी पाहणारे साक्षीदार यांची साक्ष महत्वाची ठरली. तसेच, डॉ. निलेश देवराज यांनी सदर मयतावर केलेले छवविच्छेदन अहवालावर मयतास झालेल्या जखमामुळे त्याचा मृत्यु झाला व त्यास आरोपीने केलेले मारहाणाच्या कारणाने त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. याबाबत सरकारी वकील के. आर. बागुल यांनी प्रभावी युक्तीवाद केला. त्याप्रमाणे आरोपीतास न्यायालयाने दोषी धरून भा.द.वी. कलम 304 (2) प्रमाणे गुन्हा केल्याचे सिध्द झाल्याने त्यास 10 वर्ष सश्रम कारावास व 5000 रू. दंड. दंड न भरल्यास 3 महीने साधे कैद अश्याप्रकारची शिक्षा न्यायालयाने सुनावली. सदरील कामकाजात पो.कॉ. सतीष भोई, अडावद पो.स्टे., केस वॉच. व पैरवी अधिकारी, पी. एस. आय., उदयसिंग सांळुके पारोळा पो. स्टे., पैरवी अधिकारी पो.हे.कॉ. पुरुषोत्तम वाल्डे, पो.कॉ. राहुल रणधीर, चोपडा ग्रामीण. पो.स्टे. व पो.हे.कॉ. प्रमोद पाटील, चोपडा शहर पो.स्टे., तसेच पो.कॉ. भरत इशी, मारवड पो.स्टे यांनी सहकार्य केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *