अमळनेरात श्वान चावा प्रतिबंध जागृती कार्यक्रम; पथनाट्याद्वारे केली जनजागृती

विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम;  श्वान लसीकरणाचे महत्त्व दिले पटवून

अमळनेर (प्रतिनिधी) उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन मुंबई, रोटरी क्लब ऑफ अमळनेर, श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीचे समाजकार्य महाविद्यालय अमळनेर आणि आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्वान चावा प्रतिबंध जागृती कार्यक्रमाचे आयोजन रोटरी हॉल येथे करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष देवेंद्र कोठारी होते. यावेळी आशिष चौधरी, प्रतीक जैन, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र धनगर, समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. विजयकुमार वाघमारे तसेच आधार संस्थेच्या संचालक रेणू प्रसाद उपस्थित होते. श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अभिजीत भांडारकर आणि आधार संस्था अध्यक्ष डॉ. भारती पाटील यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले. उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन मुंबईचे कार्यक्रम अधिकारी विवेक गोस्वामी यांनी प्रास्ताविक करत श्वान चावा प्रतिबंध व श्वान लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असल्याचे सांगितले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र धनगर यांनी श्वान हा शेतकऱ्यांचा मित्र आणि पाळीव प्राणी असल्याचे सांगत रेबीज आजाराबाबत मार्गदर्शन केले. कुत्रा चावल्यानंतर तातडीने उपचार घेणे आवश्यक असून रेबीज आजारावर उपचार मर्यादित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथील स्वयंसेवक सागर कोळी, किर्ती सोनवणे, यामिनी माळी, अनुजा पाटील, सचिन सावळे, प्रज्ञा शिरूडकर, आकाश सैदाने आणि मोहिनी पाटील यांनी श्वान चावा प्रतिबंध जनजागृतीवर आधारित पथनाट्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संजय कापडे, मुरलीधर बिरारी, राकेश महाजन, समाधान धनगर, मोहिनी धनगर, अश्विनी भदाणे, योगिता पाटील, ऊर्जिता शिसोदे, भावेश मराठे आणि माया जाधव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक संदानशीव यांनी केले तर आभार प्रदर्शन विवेक गोस्वामी यांनी मानले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *