
सेवा हक्क दिनानिमित्त अमळनेर तहसील कार्यालयात शपथ; वेळेत व पारदर्शक सेवा देण्याचा केला निर्धार
अमळनेर (प्रतिनिधी) सेवा हक्क दिनानिमित्त मंगळवारी अमळनेर तहसील कार्यालयात तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या दालनात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शपथ घेऊन नागरिकांना वेळेत, पारदर्शक व दर्जेदार सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी नायब तहसीलदार अजय कुलकर्णी, जगदीश पाटील, किशोर कृपाचार्य, कमलाकर बारीस्कर, अनिल चौधरी, चैताली जैस्वाल, विद्या पाटील, प्रियंका पाटील, महेंद्र सुतार तसेच विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत शासनाच्या सेवा विहित कालमर्यादेत देण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे, निष्ठेने व तत्परतेने पार पाडण्याची प्रतिज्ञा केली. तसेच सेवा वितरण प्रक्रियेत कोणताही विलंब, अडथळा किंवा भ्रष्टाचार होऊ नये यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचा संकल्प करण्यात आला.
नागरिकांच्या हक्कांचा आदर राखत सेवा भावनेतून त्यांच्या हित व कल्याणासाठी कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमात शासकीय कामकाज अधिक प्रभावी, पारदर्शक व लोकाभिमुख करण्यावर भर देण्यात आला.

Leave a Reply