
अमळनेर नगरपरिषदेच्या कायदेशीर सल्लागारपदी सहा वकिलांची नियुक्ती
अमळनेर (प्रतिनिधी) येथील नगरपरिषदेच्या कायदेशीर सल्लागारपदी शहरातील सहा नामांकित वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे नगरपरिषदेच्या विविध न्यायालयीन प्रकरणांमध्ये सक्षम कायदेशीर मार्गदर्शन मिळणार आहे.
नियुक्त करण्यात आलेल्या वकिलांमध्ये ॲड. सुरेश सोनवणे, ॲड. कुंदन साळुंखे, ॲड. सारांश सोनार, ॲड. सलीम खान, ॲड. संदीप बोरसे आणि ॲड. किरण पाटील यांचा समावेश आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या ठरावानुसार मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी नुकतेच या सर्वांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
सदर वकील नगरपरिषदेच्या वतीने दिवाणी व फौजदारी प्रकरणांमध्ये तसेच जिल्हा व सत्र न्यायालय आणि वरिष्ठ स्तरावरील दिवाणी न्यायालयांमध्ये पॅनल वकील म्हणून बाजू मांडणार आहेत.

Leave a Reply