अमळनेरात पैलाड येथे आज भव्य हिंदू संमेलन; मशाल यात्रेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन

अमळनेर (प्रतिनिधी ) हिंदू धर्म, संस्कृती आणि समाजाचे संरक्षण करून भारत मातेला परमवैभवाच्या दिशेने नेण्याचा संकल्प दृढ करण्यासाठी पैलाड येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वस्तीतील सकल हिंदू समाजाच्या वतीने आज, गुरुवार दिनांक १९ रोजी भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे संमेलन शिवाजी नगर, पैलाड येथील भवानी माता मंदिर परिसरात रात्री ८ ते १० या वेळेत पार पडणार आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संत प.पू. ह.भ.प. प्रसाद महाराज (संत सखाराम महाराज संस्थान, अमळनेर) व महामंडलेश्वर महंत १००८ ईश्वरदासजी महाराज (श्रीक्षेत्र नंदगाव, ता. अमळनेर) उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश भगवान बाविस्कर (सचिव, मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर) असतील. तसेच प्रमुख वक्ते म्हणून श्रीकांत सुभाष पाठक (प्रांत सहसंयोजक, शिवशंभु विचार मंच) मार्गदर्शन करणार आहेत. यापूर्वी सायंकाळी ६ वाजता पैलाड दरवाजा चौक ते भवानी माता मंदिर दरम्यान भव्य मशाल यात्रा काढण्यात येणार आहे. या संमेलनात सर्व हिंदू बांधव, भगिनी व मातृशक्तीने सहकुटुंब मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *