अमळनेर समाजकार्य महाविद्यालयात ‘संविधान जागर’ नाटिकेचे सादरीकरण

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या ‘संविधान जागर अभियान’ अंतर्गत श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अमळनेर संविधान जागर टीमने प्रभावी नाटिकेचे सादरीकरण केले. या नाटिकेतून स्त्रीशक्तीचा जागर करत महिलांना भारतीय संविधानाने दिलेले हक्क व अधिकार यांचे प्रभावी प्रबोधन करण्यात आले.

या नाटिकेच्या माध्यमातून महिलांवरील अन्याय, समानतेचा अधिकार, शिक्षणाचा हक्क, स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार अशा विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला. सादरीकरणाला उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक व मान्यवरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अनिता संदानशिव, भारती कोळी, सुनीता मोरे, योगिता पांडे, निवेदिता कापडणे आणि रोहिणी शिरसाठ यांनी नाटिकेत प्रभावी भूमिका साकारत उपस्थितांची मने जिंकली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, डॉ. अस्मिता सर्वैया, डॉ. श्वेता वैद्य, डॉ. अनिता खेडकर तसेच विभागप्रमुख जगदीश सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष अभिजीत भांडारकर व उपस्थित मान्यवरांनी संविधान जागर टीमच्या कार्याचे कौतुक केले.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *