
अमळनेरच्या सुखांजनी हॉस्पिटलमध्ये २.५ किलो वजनाची फायब्रॉइडची गाठ काढण्याची आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी!
अमळनेर (प्रतिनिधी) काही शस्त्रक्रिया या केवळ वैद्यकीय उपचार नसतात, तर त्या डॉक्टरांचे ज्ञान, अनुभव, संयम आणि कौशल्याची खरी कसोटी पाहणाऱ्या असतात. अशाच एका अत्यंत आव्हानात्मक शस्त्रक्रियेत सुखांजनी हॉस्पिटल, अमळनेर येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. जयेश शिंदे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाहूनगर, अमळनेर येथील सौ. चित्रा मुकेश भोई (वय ३७) यांच्या गर्भाशयातील तब्बल १८ × १५ सेंटीमीटर आकाराची आणि २,५०० ग्रॅम वजनाची फायब्रॉइडची गाठ यशस्वीरीत्या काढण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सौ. चित्रा मुकेश भोई या अतिविशाल गर्भाशयातील फायब्रॉइडच्या गुंतागुंतीच्या वैद्यकीय समस्येचा सामना करीत होत्या. गर्भाशयामध्ये एवढ्या मोठ्या आकाराची गाठ असल्याने ती सुरक्षितपणे अलग करून शस्त्रक्रिया पार पाडणे वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक आणि जोखमीचे होते. अशा शस्त्रक्रियेसाठी अचूक नियोजन, योग्य वैद्यकीय निर्णय, विशेष कौशल्य, अनुभव आणि संपूर्ण वैद्यकीय टीममधील समन्वय आवश्यक असतो. या सर्व आव्हानांवर मात करीत डॉ. जयेश शिंदे यांनी आपल्या वैद्यकीय कौशल्याच्या आणि अनुभवाच्या बळावर ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
वैद्यकीय कौशल्यासोबतच माणुसकीच्या सेवाभावाची जोड..!
आधुनिक वैद्यकीय युगात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपचारपद्धतींना महत्त्व असले, तरी डॉक्टरांचा अनुभव, रुग्णाप्रती असलेली संवेदनशीलता, योग्य वेळी घेतलेले निर्णय आणि संपूर्ण वैद्यकीय टीमची समर्पित मेहनत हे घटकही तितकेच महत्त्वाचे आहेत. सुखांजनी हॉस्पिटलमध्ये पार पडलेली ही शस्त्रक्रिया त्याचे उदाहरण ठरली आहे. रुग्णाच्या आयुष्यातील मोठे वैद्यकीय संकट दूर करण्यासाठी डॉ. जयेश शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय टीमने घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे अमळनेरच्या आरोग्यसेवा क्षेत्रातील वैद्यकीय सुविधांच्या क्षमतेचीही प्रचिती आली आहे.
रुग्णाच्या कुटुंबीयांनी दाखवलेला विश्वासही महत्त्वाचा
“अतिविशाल गर्भाशयातील फायब्रॉइडची ही समस्या अत्यंत गुंतागुंतीची होती. एवढी मोठी गाठ गर्भाशयापासून सुरक्षितपणे अलग करून शस्त्रक्रिया करणे ही खरोखरच आमच्यासाठी एक मोठी वैद्यकीय जोखीम आणि आव्हान होते. या शस्त्रक्रियेमध्ये अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागणार होता. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर अत्यंत काळजीपूर्वक नियोजन, अचूक निर्णय आणि विशेष वैद्यकीय कौशल्याची आवश्यकता होती. मात्र, भगवंताच्या कृपेने मी आणि माझ्या संपूर्ण वैद्यकीय टीमने अथक परिश्रम, एकजूट, समन्वय आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये रुग्णाच्या कुटुंबीयांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास हाही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता.”
डॉ. जयेश शिंदे, संचालक, सुखांजनी हॉस्पिटल, अमळनेर

Leave a Reply