
प्रताप महाविद्यालयात बीबीए, बीसीए व एमसीए प्रवेश प्रक्रिया सुरू; बारावी विज्ञान शाखेसाठी सुवर्णसंधी
अमळनेर (प्रतिनिधी) प्रताप महाविद्यालय, अमळनेर (स्वायत्त) येथे बीबीए, बीसीए व एमसीए या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून बारावी उच्च माध्यमिक विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित अथवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र गटातून शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे.
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र गटातील एमएचटी-सीईटी परीक्षा दिलेल्या, मात्र वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळाला नसलेल्या अथवा वैयक्तिक कारणास्तव त्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छित नसलेल्या विद्यार्थ्यांनी निराश होण्याचे कारण नसल्याचे महाविद्यालयाने स्पष्ट केले आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी प्रताप महाविद्यालयात बीबीए, बीसीए व एमसीए या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्य प्रवेश नियंत्रण कक्षामार्फत बीबीए व बीसीए अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून एमएचटी-सीईटी परीक्षेत शून्यपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र गटातील विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येणार आहे. या अभ्यासक्रमांद्वारे माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, बँकिंग, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र, उद्योजकता तसेच विविध शासकीय व खासगी क्षेत्रांमध्ये करिअरच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन, आवश्यक कागदपत्रांची माहिती तसेच ऑनलाईन प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी व पालकांनी प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे त्वरित संपर्क साधावा. बीबीए व बीसीएच्या केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया नोंदणीची अंतिम मुदत २० जुलैपर्यंत वाढविण्यात आली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन नोंदणी व प्रवेश प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन प्राचार्य प्रा. डॉ. हर्षवर्धन जाधव तसेच के.ई.एस. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीच्या संचालक प्रा. डॉ. वर्षा पाठक यांनी केले आहे.
संपर्क : बीबीए प्रवेश : प्रा. जयेश महाजन – ८३०८७८६३६८
बीसीए प्रवेश : प्रा. भाग्यश्री सपकाळे – ८३८१०५६६५०

Leave a Reply