अमळनेर शहरातील शाळा, महाविद्यलयात महात्मा फुले यांना अभिवादन

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील शाळा, महाविद्यलयात महात्मा फुले जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.

प्रताप हायस्कूलमध्ये कार्यक्रम अमळनेर येथील प्रताप हायस्कूलमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक एस.बी. निकम यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक कैलास पाटील यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी समाज सुधारणा, शिक्षण प्रसार व स्त्रीशिक्षणासाठी केलेल्या कार्याचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रतिनिधी डी. एन. पालवे यांनी केले.  आभार एन. आर. पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मण पाटील, विद्या पाटील, सचिन अहिरे, सुहास खाजोडकर, नम्रता दोरकर, जयश्री पाटील, सागर पवार व प्रसाद गोसावी यांचे सहकार्य लाभले.

 

महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन

 

अमळनेर येथील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, महाराष्ट्र  माळी समाज महासंघ, क्षत्रिय काच माळी समाज मंडळ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ, संत सावता माळी सेवा मंडळ तर्फे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यप्रेरणा स्तंभास पुष्पहार अर्पण करून तसेच महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर करत सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला.

यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा संघटक भिमराव महाजन, माळी समाज अध्यक्ष मनोहर महाजन, युवा कल्याण प्रतिष्ठानचे प्रा. अशोक पवार, संविधान जागरच्या प्रमुख श्रद्धा रेखा राजेंद्र, ठाकरे सर, माळी समाजाचे सचिव गणेश महाजन, माजी उपनगराध्यक्ष रामदास दौलत शेलकर, माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग महाजन, बी. आर. महाजन, कुबेर ग्रुपचे महेंद्र महाजन, भाजपचे शहराध्यक्ष योगेश महाजन, ॲड. रमाकांत महाजन, ॲड. कुंदन साळुंखे, कैलास गजानन महाजन, अशोक पोपट महाजन, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शहराअध्यक्षा चित्रकला प्रकाश महाजन, प्रा. प्रकाश महाजन, गणेश उखा महाजन, राजेंद्र भास्कर महाजन, प्रगती क्लासेस संचालक संदीप महाजन, हेमंत बाबूलाल महाजन, जितेंद्र महाजन यासह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ,क्षत्रिय माळी समाज मंडळाचे कार्यकारी सदस्य महिला मंडळाच्या पदाधिकारी व समता सैनिक ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *