शिष्यवृत्ती परीक्षेत सिद्धेश ज्ञानेश्वर पाटीलची चमकदार कामगिरी

अमळनेर (प्रतिनिधी) : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अमळनेर येथील साने गुरुजी विद्या मंदिर शाळेचा इयत्ता सातवीचा विद्यार्थी सिद्धेश ज्ञानेश्वर पाटील याने शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सिद्धेशने अमळनेर तालुका गुणवत्ता यादीत १६ वा, तर जळगाव जिल्हा गुणवत्ता यादीत ८० वा क्रमांक मिळवून शाळेचे आणि पालकांचे नाव उज्ज्वल केले आहे.

सिद्धेशच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांसमोर परिश्रम आणि सातत्याच्या बळावर यश मिळविण्याचा आदर्श निर्माण झाला आहे. त्याच्या यशामागे शिक्षक महेंद्र रामोशे यांचे मार्गदर्शन तसेच पालकांचे प्रोत्साहन आणि सहकार्य लाभले. सिद्धेश ज्ञानेश्वर पाटील याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे चेअरमन, सचिव, संचालक मंडळ, मुख्याध्यापक तसेच शिक्षकवृंद यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सिद्धेशच्या यशामुळे साने गुरुजी विद्या मंदिराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *