
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अमळनेरच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
प्रणव चौधरी तालुकाध्यक्ष, मनीष पाटील शहराध्यक्ष तर हूजैफा पठाण कार्याध्यक्ष

अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, अमळनेरच्या संघटनात्मक बळकटीसाठी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमध्ये प्रणव चौधरी यांची तालुकाध्यक्षपदी, मनीष पाटील यांची शहराध्यक्षपदी तर हूजैफा पठाण यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
अमळनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने काम करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांवर विश्वास व्यक्त करत त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
प्रणव चौधरी, मनीष पाटील आणि हूजैफा पठाण हे मागील काही वर्षांपासून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय तसेच विविध समस्या सोडविण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांमधील त्यांचा व्यापक संपर्क, संघटन कौशल्य, पक्षनिष्ठा आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. आगामी काळात विद्यार्थी संघटना अधिक सक्षम करणे, विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे न्याय मिळवून देणे तसेच विद्यार्थी हिताच्या विविध उपक्रमांना गती देण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी सक्रियपणे कार्य करतील, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या नियुक्ती सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष चेतन राजपूत, सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष सनी गायकवाड, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष चैतन्य संदानशिव, सोशल मीडिया विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष करण साळुंखे, सोशल मीडिया विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानदीप सांगोरे, विद्यार्थी सहसचिव चेतन बोरसे, योगेश पाटील, प्रीत शाह यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply