अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अमळनेरमध्ये भव्य रक्तदान शिबिर

खासदार स्मिताताई वाघ व आमदार अनिल पाटील यांची उपस्थिती; रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव

 

अमळनेर (प्रतिनिधी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ३१ मे २०२६ रोजी अमळनेर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आम आदमी पार्टी तालुका अमळनेरच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिताताई वाघ, त्यांची कन्या भैरवी फलांडे तसेच आमदार अनिल भाईदास पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थितांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचे स्मरण करत रक्तदान शिबिराच्या उपक्रमाचे कौतुक केले. रक्तदान शिबिराचे आयोजन आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष महेंद्र साळुंखे आणि दीक्षा महेंद्र साळुंखे यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष रामकृष्ण पाटील व वंदना रामकृष्ण पाटील, मुख्य सल्लागार मोहन मोरे, सुधाकर गजे, राजेंद्र बाळकृष्ण जाधव, ललित सातपुते, राजू धनगर आणि शेजत खाटीक यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *