शिवसेना कार्यालयात श्री संत सेवालाल महाराज यांची २८७ व्या जयंती साजरी

अमळनेर (प्रतिनिधी) श्री संत सेवालाल महाराज यांची २८७ व्या जयंती अमळनेर शहरातील शिवसेना कार्यालयात मोठ्या उत्साहात  साजरी करण्यात आली.

यावेळी ग्रामीण व शहरी विभागातील बंजारा समाजबांधव, लोकप्रतिनिधी तसेच शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

या कार्यक्रमात शिवसेना तालुका प्रमुख सुरेश अर्जुन पाटील यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन करत संत सेवालाल महाराजांच्या कार्याचा व विचारांचा आदर्श आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. त्यांनी समाजातील एकोपा, शिक्षण आणि संघटन या माध्यमातून समाजविकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहनही केले. कार्यक्रमाला विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र पाटील, उपतालुका प्रमुख भूषण कोळी, तालुका संघटक व सरपंच रामेश्वर खुर्द, गजेंद्र जाधव, तसेच संत श्री सेवालाल महाराज जयंती समिती अध्यक्ष किरण जाधव उपस्थित होते. तसेच यावेळी प्रसिद्धी प्रमुख अनिल पवार, संजय राठोड, विजय राठोड, अर्जुन राठोड, किशोर पवार, रणजीत राठोड, पांडुरंग जाधव, दीपक सैंदाणे, संदीप पवार, रितेश बोरसे, उमाकांत चव्हाण, मल्हारी पाटील यांसह सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. आभार  किरण जाधव यांनी मानले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *