
स्मृतींच्या जपणुकीतून गंगापुरीच्या विद्यार्थ्यांना मोफत स्पोर्ट्स गणवेश वाटप
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील गंगापुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कै. लहू शामराव बिऱ्हाडे व कै. सोनाबाई लहू बिऱ्हाडे यांच्या स्मरणार्थ सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्पोर्ट्स गणवेशांचे वाटप करण्यात आले. अमळनेरचे मूळ रहिवासी व फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाचे प्रा. डॉ. शरद लहू बिऱ्हाडे यांच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन कोळी सदस्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश सुपूर्द करण्यात आले. शाळेला सामाजिक भान जपत मदत केल्याबद्दल मुख्याध्यापक दीपक भामरे, उपशिक्षक विजय बिऱ्हाडे, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी प्रा. डॉ. शरद लहू बिऱ्हाडे यांचे मनापासून आभार मानले.

Leave a Reply